मेडिएशन जागरूकता अभियानात मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित
मेडिएशन जागरूकता अभियानात मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित
तालुका विधी सेवा, नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचा संयुक्त उपक्रम
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : तालुका विधी सेवा प्राधिकरण, बेलापूर आणि नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर रोजी बेलापूर न्यायालयात मेडिएशन जागरूकता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मध्यस्थी प्रक्रियेचे वाढते महत्त्व आणि न्यायप्रक्रियेतील तिची परिणामकारकता यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या मुख्य संबोधक, तथा नव वे दिवाणी व प्रथम वर्ग न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) कांचन जोशी यांनी उपस्थितांना मध्यस्थाची भूमिका, कायदे मंडळाने तयार केलेली मध्यस्थी प्रक्रिया तसेच मध्यस्थीद्वारे प्रकरणे सुलभतेने हाताळण्याचे तंत्र याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच न्यायालयीन ताण कमी करण्यासाठी मध्यस्थीची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावनेत ॲडव्होकेट मदन घरत यांनी सांगितले की, बेलापूर न्यायालय हे महाराष्ट्रातील पाच पायलट मेडिएशन सेंटरपैकी एक असून येथील कार्यक्षमता उल्लेखनीय आहे. संपूर्ण वर्षभरात येथे तब्बल ४०६७ प्रकरणे मध्यस्थीद्वारे निपटण्यासाठी पाठविण्यात आली असून हा आकडा ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. या केंद्रात ६६ मेडिएटर आणि १७ न्यायिक अधिकारी कार्यरत आहेत.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रशेखर मराठे हे मार्गदर्शन करीत असून त्यांच्या नेतृत्वाखाली समितीचे कार्य सुयोग्यपणे सुरू आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे सचिव विकास म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी उपाध्यक्ष संदीप रामकर, महिला सहसचिव हेमांगी पाटील, सभासद डिम्पल चांद्रा, मेडिएटर प्रसाद मढवी, पटेल भाऊसाहेब (वरिष्ठ लिपिक – विधी सेवा समिती), तसेच स्वाती मोरे, सुकर्ण मांढरे (प्यारा लिगल स्वयंसेवक), बेलापूर न्यायालयातील वकील आणि अशील विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

