खारघर येथील प्रसिद्ध शिल्प चौक उजळला
खारघर येथील प्रसिद्ध शिल्प चौक उजळला
बंद कारंजे, पथदिवे सुरू; नागरिकांकडून समाधान व्यक्त
खारघर, ता. ३० (बातमीदार) : खारघर सेक्टर २० मधील शिल्प चौक काही दिवसांपासून अंधारात असल्याची बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध होताच पालिकेने तातडीने लक्ष देत बंद असलेले पथदिवे व कारंजे सुरू केले आहेत. त्यानंतर परिसर पुन्हा एकदा प्रकाशमय झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खारघरमध्ये सिडकोने सेक्टर २० मधील शिल्प चौक आणि सेक्टर ४ मधील उत्सव चौक हे दोन महत्त्वाचे आकर्षणबिंदू तयार केले आहेत. उंचीवरून कोसळणारे पाणी, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि रमणीय शिल्परचना यामुळे या चौकांना विशेष ओळख मिळाली आहे. खारघरमध्ये प्रथमच येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष या चौकांकडे वेधले जाते. शिल्प चौकातून चारही दिशांना जाणारे रस्ते, दोन्ही बाजूंना असलेली उद्याने, बसथांबे, बँका आणि व्यावसायिक आस्थापने यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिल्प चौकातील पथदिवे आणि कारंजे बंद असल्याने परिसर अंधारात बुडालेला होता. नागरिकांनी वारंवार तक्रारी नोंदवल्या तरीही स्थिती कायम राहिल्याने नाराजी वाढत होती. याबाबतची बातमी सकाळमध्ये सोमवारी (ता. २७) प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सर्व दिवे व कारंजे पुनः सुरू केले. स्थानिक रहिवाशांनी पालिकेच्या जलद कृतीचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

