मुंबईत नोव्हेंबरमध्ये १२२१९ घरांची नोंदणी
मुंबईत नोव्हेंबरमध्ये १२,२१९ घरांची नोंदणी
२० टक्क्यांची वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई शहर आणि उपनगरांतील मालमत्तांच्या विक्रीचा आलेख सातत्याने चढता आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात तब्बल १२,२१९ घरांची विक्री झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मालमत्तांच्या विक्रीचा विचार करता सुमारे २० टक्क्यांची वाढ आहे. या मालमत्तांच्या नोंदणीतून राज्य सरकारला तब्बल १,०३८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
नाईट फ्रँक इंडिया या संस्थेने मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीबाबतची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये ११,६४९ मालमत्तांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईकरांचा घरखरेदीबाबतचा उत्साह कायम आहे. त्यामुळेच गेल्या ११ महिन्यांतील सर्वाधिक मालमत्ता विक्री नोव्हेंबरमध्ये नोंदली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, हाच ट्रेंड कायम राहणे अपेक्षित असल्याचे नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात नोंदणी झालेल्या घरांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांचे प्रमाण ४२ टक्के एवढे असून, एक-दोन कोटी रुपये किमतीची ३३ टक्के, दोन-पाच कोटी रुपये किमतीची १८ टक्के, तर पाच कोटींहून अधिक किमतीची सात टक्के घरे आहेत. मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील विक्री झालेल्या घरांच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये महागड्या घरांची जास्त विक्री झाल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

