शिरसाड अंबाडी मार्गावर वज्रेश्वरी एसटी बसला अपघात

शिरसाड अंबाडी मार्गावर वज्रेश्वरी एसटी बसला अपघात

Published on

एसटी बसला अपघात
शिरसाड-अंबाडी मार्गावरील घटना
विरार, ता. ३० (बातमीदार) ः शिरसाड-अंबाडी महामार्गावरील मांडवी येथे एसटीच्या बसला रविवारी (ता. ३०) अपघात झाला. यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. शिरसाड-वज्रेश्वरी या राज्यमार्गाची दुरवस्था झाल्याने अपघाताची मालिका सुरू आहे.
वज्रेश्वरी रस्त्यावर मांडवी येथे ट्रक जात होता. या वेळी मागून येणारी एसटी बस, ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रक बसला घासला. बसचालकाने वेळीच ब्रेक घेत बस थांबविली. यात बसची पुढची काच फुटली आहे. बसमधील प्रवाशांना याचा धक्का बसला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. खड्ड्यांमुळे हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले. अपघात रविवारी सकाळी मांडवी पोलिस ठाण्याजवळ घडला. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी धाव घेतली.
---
खड्डे-धुळीचे साम्राज्य
शिरसाड-वज्रेश्वरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. अति वेगात जाणारे हायवा ट्रक अपघाताला आमंत्रण देतात. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे वाहने हळुवारपणे जात असून चालकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या राज्यमार्गावर खड्डे तर आहेतच; पण रस्त्यावरून जाताना वाहनांच्या मागे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने खूप त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com