उद्धव ठाकरे गटाचा बदलापुरात धक्कादायक निर्णय

उद्धव ठाकरे गटाचा बदलापुरात धक्कादायक निर्णय

Published on

बदलापूरमध्ये ठाकरे गटाची भाजपला साथ
सात उमेदवारांचा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा

बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : राज्यात, केंद्रात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजपामध्ये तीव्र वैचारिक संघर्ष सुरू आहे. बदलापूरमध्ये मात्र याच्या उलट चित्र समोर आले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या सात उमेदवारांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार असूनही थेट भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीतील समीकरणे बदलली असून उबाठा-भाजप या अनपेक्षित युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार कविता सकट, प्रफुल्ल कांबळे, वैभव सदाफुले, मंगेश इंगळे, सुरेश शिंदे, सुभाष शिंदे, रुपेश साळवी हे उपस्थित होते. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया गवळी यांना पाठिंबा न देता भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
---
विकासासाठी हातमिळवणी
दोन्ही पक्षांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू असताना स्थानिक स्तरावर मात्र ‘विकासासाठी हातमिळवणी’ केल्याचा दावा सातही उमेदवारांनी केला. दुसरीकडे या भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) गटाच्या स्थानिक संघटनांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बदलापुरातील नगराध्यक्षपदाची लढत आता अधिक रंगतदार होणार आहे. तसेच या अनपेक्षित राजकीय मैत्रीचा अंतिम निकालावर किती प्रभाव पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com