पालघर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १-ब निवडणूक स्थगित

पालघर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १-ब  निवडणूक स्थगित
Published on

पालघरमध्ये प्रभाग क्रमांक १-ब निवडणूक स्थगित
पालघर, ता. ३० ः पालघर नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक १-ब मधील नगरसेवकपदाची निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे; मात्र नगराध्यक्षपदाची निवडणूक, तसेच १-ब हा प्रभाग सोडून इतर सर्व प्रभागांतील निवडणूक मंगळवारी (ता. २) होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाम मदनूरकर यांनी दिली.
१-ब या प्रभागामध्ये शिवसेना उमेदवार रवींद्र ऊर्फ बंड्या म्हात्रे यांच्या एका घरपट्टी प्रकरणात ठाकरे गटाचे उमेदवार आरिफ कलाडिया यांनी हरकत घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हात्रे यांना निवडणूक लढण्यासाठी दिलेल्या निकालाविरुद्ध कलाडिया यांनी पालघरच्या न्यायालयात अपील केले होते; मात्र जिल्हा न्यायाधीश अनुश्री विनोद इनामदार यांनी म्हात्रे यांचा निर्णय कायम ठेवत कलाडिया यांचा अपील अर्ज फेटाळला. न्यायालयाचा हा आदेश शनिवारी आला. पालघर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १-ब साठी निवडणूक कार्यक्रम गुरुवारी (ता. ४) जाहीर होणार आहे. बुधवारी (ता. १०) दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. तर शनिवारी (ता. २०) मतदान होणार आहे. रविवारी (ता. २१) मतमोजणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com