धारावीत शेड संस्थेतर्फे एड्स दिन साजरा
धारावीत शेड संस्थेतर्फे एड्स दिन साजरा
धारावी, ता. १ (बातमीदार) : जागतिक एड्स दिनानिमित्त धारावीतील ‘शेड’ संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात धारावीतील विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये एड्सबद्दल जनजागृती करण्यात आली. धारावी पोलिस ठाणे येथे ९० फुटी रस्त्यावर स्टॉल लावून लोकांमध्येही एड्सबद्दलची जनजागृती करण्यात आली. धारावी पोलिस ठाणे येथील पोलिस निरीक्षक दिगंती गाडवे यांनी या स्टॉलला भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करून शुभेच्छा दिल्या. या वेळी एड्सबद्दल माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. तसेच पोस्टर्स लावण्यात आली होती. मोफत कंडोमचे वाटप करण्यात आले.
एड्स नियंत्रणात आणण्यासाठी अजून सर्व पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरियम रशीद यांनी केले. शेड संस्थेतर्फे गेल्या २५ वर्षांपासून एड्स निर्मूलनाचे काम केले जात असल्याचे संस्थेचे प्रकल्प अधिकारी बाबाजी घुले यांनी सांगितले. संस्था विविध वर्गांमध्ये वर्षभर जनजागृती करत असल्याची माहिती संस्थेचे वरिष्ठ कर्मचारी निखिल वरख यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

