अल्पवयीन मुलीचे घरातून पलायन

अल्पवयीन मुलीचे घरातून पलायन

Published on

सतत मोबाईल बघू नकोस म्हटल्याने अल्पवयीन मुलीचे घरातून पलायन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : मोबाईल सतत बघू नकोस, असे आजोबा बोलल्याने एका १५ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली आहे. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुलीचे वडील वारल्याने तिच्या आईने दुसरे लग्न केले आहे. तेव्हापासून ही मुलगी तिच्या आईच्या आई-वडिलांकडे राहत होती. सतत मोबाईल बघू नकोस, फोनचा वापर कमी कर, असे काळजीपोटी आजोबा मुलीला बोलले. या गोष्टीचा राग मनात धरुन ही मुलगी मोबाईल घरात ठेवून काही न सांगता घरातून शुक्रवारी (ता. २८) निघून गेली. तिच्याबाबत नातेवाईक, मैत्रिणींकडे विचारणा केली. तसेच परिसरात शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने तिला अनोळखी व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच एका अल्पवयीन मुलाने मोबाईल पाहू नकोस, असे वडिलांनी म्हंटल्याने घर सोडून निघून गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. ही ताजी असतानाच दुसरी घटना समोर आल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com