ज्येष्ठ नागरिकांना पालिकेची भेट

ज्येष्ठ नागरिकांना पालिकेची भेट

Published on

ज्येष्ठ नागरिकांना पालिकेची भेट
पनवेलमधील नऊ विरंगुळा केंद्रे सुरू करणार
पनवेल ता. १ (बातमीदार)ः महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक, सक्रिय जीवनशैलीसाठी पनवेल पालिका पालिका क्षेत्रात २० विरंगुळा केंद्र बांधणार आहे. त्यापैकी नऊ केंद्र लवकरच कार्यान्वित होणार असल्याने नवीन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील ज्येष्ठांना सुरक्षित, शांत, तटस्थ वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रे उभारली जात आहेत. या केंद्रांमध्ये दररोज खेळ, वाचन, योग, समुपदेशन, आरोग्य तपासणी, मनोरंजनात्मक उपक्रम आणि विविध प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेता येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश वयोवृद्धांच्या दैनंदिन जीवनात उत्साह, मानसिक समाधान वाढवणे तसेच सामाजिक सहभाग दृढ करणे हा आहे. विरंगुळा केंद्रांमध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, जुगार, धूम्रपान आणि कोणतेही व्यावसायिक उपक्रमांना बंदी आहे. केंद्रांचा उपयोग केवळ आरोग्य, मनोरंजन, संवाद आणि सामाजिक सहभागासाठीच केला जाणार आहे. पनवेल पालिकेचा हा उपक्रम शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
------------------------------
या ठिकाणी सुरू होणार
खारघर पाच, कळंबोली सहा, कामोठे दोन, नवीन पनवेल तीन, पनवेल एक, खांदेश्वर एक, नावडे दोन अशी २० ठिकाणांची निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात प्रायोगिक स्वरूपात खारघर सेक्टर २१, १९, १५ तसेच कळंबोली सेक्टर १० इ, ५ आणि पनवेल सेक्टर ८ येथे केंद्रे उभारण्यात येत आहेत. आणखी तीन ठिकाणांची नावे अंतिम टप्प्यात असून, लवकरच जाहीर केली जाणार आहेत.
------------------------------
विरंगुळा केंद्रांमुळे जीवनात नवा उत्साह, सामाजिक सहभाग आणि मानसिक स्वास्थ्याची अनुभूती मिळेल. पहिल्या टप्प्यातील केंद्रांचे काम वेगाने सुरू असून, पुढील काही आठवड्यांत काही केंद्रे नागरिकांसाठी खुली करण्यात येतील.
- महेंद्रकुमार मेघमाळे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com