

शिलाई, घरघंटींचे महिलांना वाटप
पनवेल (बातमीदार)ः महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून चार हजार २५० महिलांना प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत शिलाई, घरघंटी मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना घरगुती उद्योगाची संधी मिळणार आहे. महिलांनी मशीनचा योग्य वापर करून स्वावलंबी व्हावे, असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अरुण भगत तसेच अधिकारी या वेळी उपस्थित होते. उज्ज्वला, शौचालय, मातृवंदना, आरोग्य योजना, किसान सन्मान, प्रधानमंत्री आवास, लाडकी बहीण अशा विविध योजनांमधून महिलांचे सक्षमीकरण सुरू आहे. याच अनुषंगाने पनवेलमधील बहिणींसाठी हा स्वयंरोजगार उपक्रम राबविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.