झाडांमध्ये दडले पथदिवे

झाडांमध्ये दडले पथदिवे

Published on

झाडांमध्ये दडले पथदिवे
अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर अंधार
अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) : अंबरनाथ शहरातील अनेक रस्ते सध्या अंधाराच्या विळख्यात सापडले आहेत. शहरातील पथदिवे एकतर बंद आहेत किंवा जे सुरू आहेत ते उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये पूर्णपणे झाकले गेले आहेत. यामुळे रस्त्यांवर पुरेसा प्रकाश पडत नसल्याने नागरिक आणि विशेषतः महिलांमध्ये भीती पसरली आहे.

झाडांच्या जाड फांद्यांमुळे रस्त्यांवर थेट प्रकाश पोहोचत नाही. यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वाहनचालकांना खड्डे, वळणे किंवा पादचारी वेळेत दिसत नाहीत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवर पडणारा प्रकाश इतका कमी आहे की पादचाऱ्यांना काही पावले पुढेही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे खोलगट ठिकाणी पाय अडखळणे आणि ठेच लागण्याच्या घटना घडत आहेत. अंधारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रचार मोहिमेसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांनाही अंधाऱ्या रस्त्यांवरून चालताना भीती वाटते आणि पायाला ठेच लागून जखमा झाल्याचे बोललो जात आहे. बंद पडलेले पथदिवे तत्काळ सुरू करावेत, झाडांची योग्य छाटणी करून रस्त्यांवरील प्रकाश पुनर्स्थापित करावा, अंधारामुळे होणारे अपघात आणि असुरक्षिततेला आळा घालावा, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.

दयनीय अवस्था असलेले प्रमुख भाग
पूर्व भाग : हुतात्मा चौक ते स्टेशन परिसर, कानसई, वडवली, शिवमंदिर मार्ग, स्वामी समर्थ चौक, बारकूपाडा.
पश्चिम भाग : कल्याण-बदलापूर मार्ग आणि इतर अनेक भाग.
या ठिकाणी काही दिवे कायम बंद आहेत, तर काही दिव्यांवर वेलींनी विळखा घातला आहे किंवा ते इमारतीच्या संरक्षक भिंतीला असलेल्या झाडांमध्ये झाकले गेले आहेत.

प्रशासनाची उदासीनता
सध्या शहरात निवडणुकीचे वातावरण तापले असल्याने नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यांवर फिरत आहेत. अशा परिस्थितीतही रस्त्यांवरील प्रकाशयोजना सुधारण्याबाबत प्रशासनाची उदासीनता प्रकर्षाने जाणवत असल्याचे नागरिक बोलत आहेत. पालिकेकडे मनुष्यबळ कमी असून, ते कर्मचारीही आता निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याने केवळ आश्वासने दिली जात आहेत, असे नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com