रात्री उशिरापर्यंत रणनीतीचे ‘खेळ’ रंगणार

रात्री उशिरापर्यंत रणनीतीचे ‘खेळ’ रंगणार

Published on

कासा, ता. १ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी दुहेरी लढत रंगली आहे. शनिवार (ता. २९) आणि रविवारी (ता. ३०) प्रमुख पक्षांनी संपूर्ण ताकद झोकून देत रॅली काढल्या. शनिवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर रविवारी भाजपची शक्तिप्रदर्शन रॅली शहरभराचा केंद्रबिंदू ठरली. रामवाडी येथून सकाळी ११ वाजता निघालेल्या या रॅलीत मोटारसायकलच्या ताफ्यांमुळे आणि घोषणाबाजीमुळे रामवाडी, सागरनाका, पारनाका, आगर, इराणी रोड आणि स्टेशन रोड परिसर उत्साहाने दणाणून गेला. अधिकृत प्रचार आज (ता. १) थांबणार असला तरी रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी, संपर्क मोहिमा आणि रणनीती आखण्याचे ‘खेळ’ रंगणार असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे.

भाजपचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत आणि शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र (राजू) माच्छी आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या शक्तिप्रदर्शनाने डहाणूत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नगर परिषदेतील १३ प्रभागांसाठी २७ नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत तब्बल ६५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे डहाणूच्या राजकारणात अभूतपूर्व अशी चुरस निर्माण झाली आहे. ठाकरे गट आणि माकपचे काही उमेदवारही स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने अनेक प्रभागांत लढत तिहेरी-चौरंगी होण्याची शक्यता आहे.

बाजार बंद ठेवल्याने नाराजी
नगराध्यक्षपदाच्या प्रचारासाठी दोन्ही बाजूंनी मोठ्या तोफांचे आगमन झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी डहाणूत तापमान चांगलेच तापले. सोमवारचा डहाणू बाजार निवडणुकीमुळे बंद ठेवल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये नाराजीही दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com