ठाण्यात समता, बंधुत्व आणि देशप्रेमाचा धर्म स्नेह संमेलनात जल्लोष..
ठाण्यात सर्वधर्म स्नेहसंमेलनात जल्लोष
समता, बंधुत्व आणि देशप्रेमाचा संदेश
ठाणे, ता. १ (बातमीदार) : संविधानाच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने व महात्मा जोतिबा फुले यांच्या १३५व्या स्मृतिदिनानिमित्त समता विचार प्रसारक संस्थेचे १५वे वार्षिक सर्वधर्म स्नेहसंमेलन ठाण्यातील मो. ह. विद्यालयात उत्साहात पार पडले. राबोडी फ्रेंड सर्कल शाळेतील नऊ विद्यार्थिनींनी ‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना’ या संदेशावर आधारित मुशायऱ्याने वातावरण भारून टाकले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर तर संस्थेच्या कार्यकर्त्या व बुरोंडकर शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना शेख यांनी सूत्रसंचालन केले.
इस्लाम धर्माच्या शिकवणीवर झोएब मुनीब शेख, तर बौद्ध धम्मातील शांतता-समतेचा संदेश संस्थाध्यक्षा हर्षलता कदम यांनी मांडला. संयोजक मनीषा जोशी यांनी धर्म-जातीच्या नावावर वाढणाऱ्या द्वेषाविरुद्ध संविधान मूल्यांची गरज अधोरेखित केली. कंत्राटी महिला कामगारांच्या समस्या विश्वस्त मीनल उत्तुरकर यांनी प्रकाशात आणल्या असून अनिता कुंभावत व साबेरा सौदागर यांनी पगारातील अन्याय, कामातील हलाखीची परिस्थिती याबद्दल सांगताना उपस्थितांची मने पिळवटली.
हिरजी गोहील क्रीडा जल्लोषात क्रिकेट, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ व चित्रकला स्पर्धेतील विजेते-सहभागींना पदके व प्रमाणपत्रांनी गौरवण्यात आले. राबोडी फ्रेंड्स सर्कलचे विश्वस्त सैद, चळवळीतील कार्यकर्ते अविनाश कदम आणि संस्थेच्या सचिव लतिका सु. मो. आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक डॉ. संजय गोपाळ, भारत जोडो अभियानचे सुब्रतो भट्टाचार्य, वृषाली कुलकर्णी, अनेक पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक जगदीश खैरालिया यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, एकलव्यचे कार्यकर्ते अजय भोसले, ऋतुराज परह्यार, किशन बेदी आणि राबोडी फ्रेंड सर्कल शाळेतील शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

