बालहृदय शस्त्रक्रियेसाठी जनजागृती

बालहृदय शस्त्रक्रियेसाठी जनजागृती

Published on

बालहृदय शस्त्रक्रियेसाठी जनजागृती
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊनतर्फे ‘स्कूल आर-थॉन’ उपक्रम
डोंबिवली, ता. १ ः रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊनच्या वतीने तिसऱ्यांदा ‘स्कूल आर-थॉन’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना शारीरिक क्रियाशीलता, आरोग्यदायी स्पर्धा, सामाजिक उत्तरदायित्व आणि आत्मविकासासाठी प्रोत्साहित करणे हा आहे, तर चिल्ड्रन रनिंग टू सेव्ह अ हार्ट म्हणजेच मुलं धावताहेत एका हृदयाला जीवनदान देण्यासाठी, हा संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात येणार आहे. ‘सकाळ’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. 
बालहृदय विकार हा लहान वयात आढळल्यास जीवघेणा ठरू शकतो, मात्र योग्य वेळी शस्त्रक्रिया झाल्यास मूल पुढील आयुष्य निरोगी जगू शकते. भारतात दरवर्षी दोन हजारांहून अधिक बालकांना अशा शस्त्रक्रियांची आवश्यकता भासते. रोटरी वर्ष २०२५-२६ साठी टायटन जिल्हा गव्हर्नर हर्ष माकोल यांनी बालहृदय शस्त्रक्रिया हा आपला थ्रस्ट एरिया प्रोजेक्ट म्हणून घोषित केला आहे. जिल्ह्यातील अनेक क्लब अशा उपक्रमांद्वारे निधी संकलित करून या शस्त्रक्रियांसाठी मदत करत आहेत.
आरसीडीडीतर्फे स्कूल आर-थॉन मधून संकलित झालेला निधी श्री सत्य साई हॉस्पिटल, बेलापूर येथे होणाऱ्या बालहृदय शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया गरीब आणि गरजू  मुलांवर केल्या जाणार आहेत. या उपक्रमाद्वारे मुलांच्या आरोग्यवर्धनाबरोबरच समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची संधीही मिळाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीकरिता ९८६७२३६१३६ संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com