स्वस्त घरांचे मायाजाल
स्वस्त घरांचे मायाजाल
सिडकोची ३,६८७ बांधकामांना नोटिसा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : शहरातील गावठाणातील जागांवरील आलिशान, टोलेजंग इमारतींच्या विक्रीचा सपाटा भूमाफियांनी लावला आहे. सिडकोने अशा ३,६८७ बेकायदा घरांना नोटीस बजावली असून, त्यावर लवकरच हातोडा पडणार असल्याने स्वस्तातील घराच्या नावाखाली फसवणुकीचा धोका आहे.
नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या हद्दीत वेगाने बेकायदा बांधकामे वाढलेली आहेत. पावसाळ्यात कारवाई सावकाश होत असल्याने गैरफायदा घेऊन भूमाफियांकडून बेकायदा इमारती उभ्या करण्याच्या हालचाली वाढतात. पनवेल, उरण शहरे त्याला अपवाद राहिलेली नाहीत. बेकायदा घरांमुळे अनेकदा उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहे. त्यामुळे महापालिका, सिडको प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात सिडकोच्या मालकी हक्क असणाऱ्या जागा आहेत. या जागा उद्याने, मैदाने, बहुउद्देशीय इमारती आदींच्या वापरासाठी आरक्षित केलेल्या आहेत. मात्र काही स्थानिक परप्रांतीय भूमफियांच्या मदतीने स्वस्तात घर देण्याची प्रलोभने दाखवली जात आहेत. अशा प्रकाराला पायबंद घालण्यासाठी सिडकोने दिघा गावापासून पनवेल-उरण परिसरातील बेकायदा इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.
-----------------------------------------
बेकायदा बांधकामांची यादी
कामोठे - ७, पनवेल शहर - ६, पुष्पकनगर - २, खारघर - १६७, कळंबोली - ४२, उलवे - ६६, करंजाडे - १०, तळोजा - ३, द्रोणागिरी - १३९, लॉजिस्टिक पार्क - ५, ऐरोली - २०९, घणसोली - २,४३९, कोपरखैरणे - ६२, वाशी- ५०, सानपाडा - १२९, सीबीडी-बेलापूर - २८१, नेरूळ - ७०.
------------------------------------------
घणसोलीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे
नवी मुंबई शहरात दिघा नोड अनधिकृत बांधकामांमुळे कुप्रसिद्ध झाला आहे. परंतु सध्या सर्वाधिक अनधिकृत बांधकामे एकट्या घणसोली नोडमध्ये आढळून आली आहेत. सिडकोने बजावलेल्या साडेतीन हजार नोटिसांपैकी घणसोलीत दोन हजार ४३९ इतकी बेकायदा बांधकामे उभी आहेत.
------------------------------------------
कोणाचेही वास्तव्य नसलेल्या इमारतींवर आधी कारवाई होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच इमारतींवर कारवाई होणार आहे. सिडकोने प्रसिद्ध केलेल्या यादीतून नागरिकांची फसवणूक होऊ नये, हा त्यामागचा हेतू आहे.
- सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

