किरकोळ वादातून शेजाऱ्याला बेदम मारहाण

किरकोळ वादातून शेजाऱ्याला बेदम मारहाण

Published on

किरकोळ वादातून शेजाऱ्याला बेदम मारहाण
दोघा मित्रांवर गुन्हा दाखल
भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : लग्नाच्या आदल्या रात्री हळदीत डीजेच्या तालावर नाचण्यात दंग असताना झालेल्या किरकोळ वादातून दोघा मित्रांनी आपसात संगनमताने शेजाऱ्याला बेदम मारहाण करण्यासह चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल आणि सद्दाम लस्सी अशी गुन्हा दाखल झालेल्या मित्रांची नावे आहेत, तर विशाल रवी यादव (२५) असे जखमी मित्राचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल आणि सोहेल हे दोघे कैलासनगरमध्ये एकाच परिसरात राहतात, तर विशाल हा त्याचा मित्र सुशील बडारी याची २५ नोव्हेंबर रोजी हळद असल्याने रात्री आठच्या सुमारास हळदीत गेला होता. दरम्यान, विशाल हा खुर्चीत बसलेला असतानाच अचानकपणे सोहेल हा विशालच्या अंगावर पडल्याने विशालने सोहेलला ढकलल्याने या गोष्टीचा राग मनात धरून सोहेलने विशालला चापटीने मारहाण केली, तर सोहेलचा मित्र सद्दामने ही बेदम मारहाण केली. त्यानंतर विशाल हा घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात निघाला असता सोहेलने विशालला पकडून त्याच्या कानास जोरात चावा घेऊन त्यास गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी विशालच्या फिर्यादी वरून दोघांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com