मेहनतीमुळे पडीक जमिनीचे झाले सोने
स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आदिवासी पाडे फुलले

मेहनतीमुळे पडीक जमिनीचे झाले सोने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आदिवासी पाडे फुलले

Published on

पनवेलचे आदिवासी पाडे फुलले!
मेहनतीमुळे पडीक जमिनीचे झाले सोने
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : पनवेल तालुक्यातील आदिवासी शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ''प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'' ही उक्ती खरी करून दाखवली आहे. ईशान्य फाउंडेशन आणि दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मदतीने सीएसआर प्रकल्पांतर्गत २०१३ पासून पनवेल तालुक्यातील २८ गावे व ११ पाड्यांतील शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीला फळबाग आणि भाजीपाला उत्पादनात रूपांतरित केले जात आहे. प्रकल्पात मृद व जलसंधारणाचे प्रशिक्षण, ठिबक सिंचन, उच्च घनतेची लागवड (पाच गुंठ्यात ५० केशर आंब्याची रोपे) आणि अर्धा एकरवर आंबा फळबाग लागवडीसाठी मदत दिली जाते.
आतापर्यंत ४३० शेतकऱ्यांकडे आंबा फळबाग विकसित झाली. २०२४-२५ मध्ये ३८,८३९ किलो आंबा उत्पादनातून ३४.५६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. ५५० शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी सहाय्य ; सरासरी वार्षिक उत्पन्न ७५,८३३ पर्यंत वाढ, ७७३.२५एकर क्षेत्रावर शाश्वत शेती सुरू झाली असून ७३ टक्के कुटुंबांचे हंगामी स्थलांतर कमी झाले किंवा थांबवले आहे.
वाडी उपक्रमाने तंत्रज्ञानाधारित शेती आणि हाय-डेन्सिटी प्लांटेशनसारख्या आधुनिक पद्धतींच्या माध्यमातून कुटुंबांपर्यंत बदल घडवून आणता येतो, हे प्रभावीपणे दाखवून दिले आहे, असे दीपक फर्टिलायझर्सचे नरेश पिनिसिटी यांनी सांगितले.
-----------------------------
प्रेरणादायी बदल
भल्याचीवाडी येथील चंद्रा आणि विकास निरगुडा यांनी पाणी संसाधन विकासामुळे विक्रमी ५७ हजार ५०० रुपये हंगामी उत्पन्न मिळवले. तर गाढेश्वर येथील महादी आणि दत्तू दुमणे यांना आंबा आणि भाजीपाला विक्रीतून एकूण ७८ हजार ९२० रुपये उत्पन्न मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com