परमेश्वर कदम यांना समाजभूषण पुरस्काराने गौरव
परमेश्वर कदम यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : परमेश्वर कदम यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कामाची नोंद घेत त्यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते प्रदान झाला. साई दिशा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या सोहळ्यात अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेते मुरली शर्मा यांचाही आदरपूर्वक सत्कार झाला. कदम यांनी २००५ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. या उपक्रमातून घाटकोपरमधील कामराज नगर परिसरातील हजारो झोपडीधारकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समाजासाठी सातत्याने केलेल्या त्यांच्या कामामुळे हा सन्मान अधिक अर्थपूर्ण ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

