आनंदनगरमध्ये नागरीवस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट आनंदनगरमध्ये नागरीवस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट

आनंदनगरमध्ये नागरीवस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट
आनंदनगरमध्ये नागरीवस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट
Published on

नागरी वस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट
रहिवाशांसह भाजप रस्त्यावर उतरणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका गृहसंकुलालगत असलेल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम, लॉजिंग उभारण्याचा घाट घातला जात आहे. यासंदर्भात, परिमंडळ उपायुक्तांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कारवाईला दिरंगाई केल्यास रहिवाशांसह भाजप रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
एका बाजूला निवासी संकुल, मंदिर आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे सभागृह असताना येथील मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम, लॉजिंगसाठी बांधकाम सुरू केले आहे. यामुळे भविष्यात परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आनंदनगर परिसरातील विजय वाटिका गृहसंकुलातील रहिवाशांनी भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संजय केळकर यांना निवेदन दिले. या बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाची दखल घेत केळकर यांनी पालिकेच्या संबंधित परिमंडळ उपायुक्तांशी चर्चा करत तातडीने कारवाईची सूचना केली. तसेच, कारवाईत दिरंगाई झाल्यास रहिवाशांसह भाजपदेखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पूर्णा रहिवाशांच्या न्यायलढ्यास पाठिंबा
या कार्यक्रमात भिवंडी पूर्णा येथून रहिवासी आले होते. बिल्डरने केलेल्या फसवणुकीमुळे अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असल्याने १०४ कुटुंबे वाऱ्यावर येणार आहेत. या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी राहू, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. या वेळी बाळकुम येथील घर बळजबरीने तोडणे, ब्रह्माळा तलाव समस्या, गृहसंकुलांना बाकडे आणि डस्टबीन, महावितरण, विद्युत विभाग आदी विविध विषयासंदर्भात निवेदने प्राप्त झाली.

.................................
आतापर्यंत ३५० सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ
मंत्रिमंडळ स्तरावर, अधिवेशनात आणि विभागनिहाय पाठपुरावा केल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यभरात सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३५० सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळाला असून, पुढील महिन्यात उर्वरित ८० कामगारांनादेखील याचा लाभ होईल. त्यामुळे नवीन प्रकरणे वगळता एकही प्रकरण शिल्लक राहणार नसून हा मी केलेल्या पाठपुराव्याचा विजय असल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com