नगर परिषद निवडणुकीत जव्हार प्रशासन सज्ज

नगर परिषद निवडणुकीत जव्हार प्रशासन सज्ज

Published on

जव्हार, ता. १ (बातमीदार) : नगर परिषद निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जव्हार शहरात चोख बंदोबस्तात उद्या (ता. २) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.

नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदांकरिता १० प्रभागांची रचना करण्यात आली असून, एकून ११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासह १०० मीटर अंतरावर प्रत्येकी दोन पोलिस शिपाई अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष, तीन कर्मचारी व एक शिपाई अशी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ साठी दोन बूथची व्यवस्था करण्यात आली आहे, तर प्रभाग क्रमांक २ ते १० करिता प्रत्येकी एक मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रोहन शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com