नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रंगीत तालीम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रंगीत तालीम

Published on

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रंगीत तालीम

उड्डाणांसाठीची तयारी अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस मोठ्या प्रमाणात रंगीत तालीम घेण्यात आली. येत्या काही आठवड्यांत विमानतळ सुरू करण्याच्या तयारीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. प्रवासी नियोजन, सुरक्षा व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद, बॅगेज हाताळणी तसेच टर्मिनल ऑपरेशन्स या सर्वांची वास्तविक परिस्थितीप्रमाणे चाचणी या तालिमीत करण्यात आली.

रंगीत तालिमेदरम्यान प्रवाशांच्या प्रवेशापासून ते बोर्डिंग गेटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया तपासली गेली. चेक-इन काउंटर, सिक्युरिटी होल्ड एरिया, ड्यूटी फ्री झोन, दुकाने, एअरोब्रिज यांसह प्रत्येक विभागातील कामकाज सुरळीत आहे का याचा आढावा घेण्यात आला. सामान हाताळणी सिस्टिम, स्क्रीनर्स, एक्स-रे मशीन, रनवे-टॅक्सी वे चाचण्या आणि विविध यांत्रिक उपकरणांची क्षमता व प्रतिसाद वेगदेखील तपासण्यात आला. म्युनिक विमानतळातील जर्मन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशनल रेडीनेस अँड एअरपोर्ट ट्रान्स्फर प्रक्रियेनुसार ही तालीम राबवली गेली.
-------
विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग
सुरक्षा यंत्रणा, कस्टम, इमिग्रेशन, सीआयएसएफ, विमानतळ व्यवस्थापन व इतर सरकारी विभागांचे पथक या रंगीत तालमीत सहभागी झाले. रंगीत तालीम यशस्वी पार पडल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मार्ग अधिक सुकर झाला असून, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठीची तयारी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. या सरावावेळी अकासा एअर, इंडिगो आदी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com