एल्फिन्स्टन पूल बधितांच्या घराबाबत आज एमएमआरडीएची म्हाडासोबत महत्वपूर्ण बैठक

एल्फिन्स्टन पूल बधितांच्या घराबाबत आज एमएमआरडीएची म्हाडासोबत महत्वपूर्ण बैठक

Published on

‘एल्फिन्स्टन’बधितांच्या घराबाबत आज बैठक
पुनर्वसनाबाबत होणार चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : एमएमआरडीएकडून उभारल्या जात असलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गावर एल्फिन्स्टन येथे डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी येथील लक्ष्मी निवास आणि हाजी नूरानी चाळ या इमारतीमधील ८३ बाधित रहिवाशांचे म्हाडाच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या सदनिकांबाबत आढावा घेण्यासाठी एमएमआरडीए आणि म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. २) दुपारी होणार आहे. त्यामध्ये रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय होणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एल्फिन्स्टन येथे एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार असून, त्यासाठी जुना पूल काढण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच नव्या पुलासाठी पायलिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील चाळींना हादरे बसत असल्याने लवकरात लवकर येथील रहिवाशांची म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. त्या गाळ्याची म्हाडाने नुकतीच दुरुस्ती केली आहे. त्यामुळे त्याचा आढावा घेतानाच त्याचे वाटप कसे करता येईल, या सदनिकांवर संबंधित हाउसिंग सोसायट्यांची किंवा अन्य घटकांची थकबाकी आहे का, याबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर रहिवाशांच्या पुनर्वसनाची कार्यवाही सुरू होऊ शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com