मेट्रोसाठी नितीन उड्डणपूल बंद
मेट्रोसाठी नितीन उड्डाणपूल बंद
रुफ वॉटर ड्रेनेज बसवण्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : पावसाळयात मेट्रो मार्गिकेवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कॅडबरी मेट्रो स्टेशनवर रुफ वॉटर ड्रेनेज गटारे बांधण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी ३० टन वजनाची क्रेन दाखल झाली आहे. या क्रेनमुळे रस्ता व्यापला जात असल्यामुळे ठाण्याहून घोडबंदर मार्गे जाणारा नितीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी रात्रीच्या सत्रात बंद ठेवण्यात आला आहे.
ठाण्यातील काही मेट्रो स्टेशन डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुढील वर्ष उजाडणार असल्याची शक्यता आहे; मात्र नियोजनानुसार, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी मेट्रो स्टेशन पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहेत. त्या अंतर्गतच आता कॅडबरी मेट्रो स्थानकात पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी रुफ वॉटर ड्रेनेज उभारण्याचे काम संबंधित प्राधिकरणाने हाती घेतले आहे. हे काम ३० टन मोबाईल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. त्याला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नितीन कंपनी ते कॅडबरीपर्यंतचा उड्डाणपूल २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत रात्रीच्या सत्रात बंद ठेवण्यात आला आहे. रात्री ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा पूल बंद राहणार असून, या पुलावरून नाशिक, घोडबंदर मार्गावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे; मात्र उड्डाणपुलाशेजारील रस्त्याने नितीन कंपनी चौक आणि कॅडबरी जंक्शन येथून पुढे जाता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

