हॉटेलमधील  सेक्स रॅकेटवर अंधेरीत कारवाई

हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर अंधेरीत कारवाई

Published on

हॉटेलमधील सेक्स रॅकेटवर अंधेरीत कारवाई
अंधेरी, ता. १ (बातमीदार) ः अंधेरीतील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मोहम्मद दाऊद मोहम्मद अख्तरअली शेख या २३ वर्षांच्या व्यवस्‍थापकाला पोलिसांनी अटक केली.
दोन विदेशी तरुणींची सुटका केली असून, या दोघींनाही महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अंधेरी येथील या हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती.
गुरुवारी (ता. २७) बोगस ग्राहक हॉटेलमध्ये गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याने व्यवस्‍थापक मोहम्मद दाऊदकडे काही तरुणींची मागणी केली होती. या वेळी त्याने त्याला दोन विदेशी तरुणींना दाखवून एका तरुणीमागे साडेतीन हजार रुपयांचा मोबदला मागितला होता. त्याने एका तरुणीची निवड केली, त्यानंतर ते दोघेही एका रुममध्ये गेले होते. बोगस ग्राहकाकडून पोलिसांना मिस कॉल मिळताच पवई पोलिसांनी तिथे छापा टाकला होता. एक तरुणी युगांडा आणि दुसरी केनियाची रहिवासी आहे. त्यांच्या चौकशीत हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याचे समोर आले. या पोलिसांनी रोकड, मोबाईल जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com