देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा झंझावात

देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा झंझावात

Published on

देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा झंझावात
नगर परिषद निवडणुकीनिमित्त ३७ सभांतून मतदारांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात झंझावाती प्रचार दौरे करीत तब्बल ३७ सभा घेतल्या. विविध जिल्ह्यांतील या सभांसह त्यांनी असंख्य ऑनलाइन सभा घेत मतदारांना संबोधित केले. या वेळी सरकारने केलेली विकासकामे, महिला सक्षमीकरणासह विविध मुद्द्यांवर भर दिला.
राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी मातब्बर नेते मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रचार सभा घेण्याचा विक्रम या वेळीही कायम ठेवला. नगर परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी नागपूर विभागात सर्वाधिक सभा घेतल्या. राज्यातील इतर प्रमुख विभागांमध्येही मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रचारसभा घेत नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागात त्यांनी प्रत्येकी सात सभा घेतल्या. या सभांमधून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महत्त्वाच्या स्थानिक संस्थांवर पारदर्शक आणि विकासकामांवर त्यांनी भर दिला.
----
विभागनिहाय सभा
छत्रपती संभाजीनगर विभागात मुख्यमंत्र्यांनी उदगीर, लोहा, हिंगोली, परतूर, पैठण, बीड, खुलताबाद, नाशिक विभागात जामखेड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगाव, पिंपळगाव बसमंत, पुणे विभागातील अक्कलकोट, सांगोला, चंदगड, कराड, उरुण-ईश्वरपूर, भोर, आळंदी, अमरावती विभागात यवतमाळ, वाशिम, हिवरखेड, धारणी, चिखली, तर कोकण विभागात डहाणू, पालघर आणि बदलापूरमध्ये त्यांच्या झंझावाती सभा झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com