डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाचे प्रकाशन उत्‍साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाचे प्रकाशन उत्‍साहात

Published on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाचे प्रकाशन उत्‍साहात
मुंबई, ता. १ : प्रा. विजय कृष्णा मोहिते लिखित पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सिद्धार्थ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पार पडला.
पॅन्थरचे संस्थापक सदस्य आणि साहित्यिक ज. वी. पवार, सद्धम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर तसेच भवन्स महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. क्रांती गवळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ज. वी. पवार यांनी पाली भाषा ही प्राचीन भारतीयांची राजभाषा असून, बुद्धांनी आपल्या उपदेशाच्या प्रसारासाठी तिचा उपयोग केल्याने तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे नमूद केले, तर प्रा. आनंद देवडेकर यांनी बौद्ध मिशनच्या कार्यात सक्रिय होण्याचे आवाहन केले. पाली साहित्य हे जगातील सर्वात प्राचीन स्त्रीवादी साहित्य असल्याचे मत डॉ. क्रांती गवळी यांनी व्यक्त केले.
माजी ग्रंथपाल श्रीकांत तळवटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक सयाजी वाघमारे, सुमेध जाधव, पत्रकार-साहित्यिक गुणाजी काजीर्डेकर, धम्मलिपी तज्ज्ञ छाया पाटील, अभिनेत्री सावित्री मेधातुल आणि संतोष खामगांवकर यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com