१२० वर्षे जुन्या मफतलाल इंडस्ट्रीजने कात टाकली!

१२० वर्षे जुन्या मफतलाल इंडस्ट्रीजने कात टाकली!

Published on

१२० वर्षे जुन्या मफतलाल इंडस्ट्रीजने कात टाकली!
मुंबई, ता. १ : गुजरातच्या नाडियाद शहरात १२० वर्षांपासून कापड निर्मिती करणाऱ्या मफतलाल इंडस्ट्रीजने कात टाकली असून, कपड्यांबरोबरच गणवेश, रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी लागणारे कपडे, चादरी, डायपर आदी साहित्यनिर्मिती सुरू केली आहे.
कंपनीच्या यावर्षीच्या २,८०० कोटी रुपये उत्पन्नापैकी ४० टक्‍के उत्पन्न कापडनिर्मितीमधून तर ५० टक्के उत्पन्न ग्राहकोपयोगी वस्तूंमधून आणि १० टक्के उत्पन्न डिजिटल सेवांमधून मिळते. लहान मुलांचे डायपर, रुग्णालयाचे युनिफॉर्म, शस्त्रक्रियेसाठी लागणारे संपूर्ण किट, हॉटेल कर्मचाऱ्यांचे आणि सैनिकांचे तसेच शाळकरी मुलांचे गणवेश आदी वस्तूंच्या निर्मिती कंपनी करतेच. त्याचबरोबरच शाळा तसेच सरकारी संस्थांचे डिजिटायझेशन करण्याचा व्यवसायही सुरू केला आहे, असे कंपनीचे एमडी आणि संस्थापकांच्या पाचव्या पिढीचे वारस प्रियावर्त मफतलाल यांनी सांगितले. गेल्या दोन-तीन वर्षांत तैवान, बांगलादेश, श्रीलंका यांच्या तुलनेत भारतीय कपड्यांना महत्त्व आल्यामुळे कंपनीने आता निर्यातीवरही भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी ३० ते ४० भारतीय एमएसएमई भागीदारांशी सहकार्य केले आहे. हॉस्पिटलची उत्पादने, सैनिकी गणवेश आदी महत्त्वाच्या वस्तू नाडियादमध्ये निर्माण होतात. आता सेनादलाच्या गरजेच्या १५ ते २० टक्के गणवेश आम्ही पुरवतो. आखाती देशातील सेनादले तसेच पोलिसांनाही गणवेश पुरवतो. यावर्षी सीमा सुरक्षा दलालाही आम्ही गणवेश दिले. स्पेन पोलिस, आफ्रिकेतील काही देशांचे सैन्य यांनाही गणवेश दिले. एक-दोन वर्षात हे प्रमाण वाढेल, असेही मफतलाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com