शाळेला बॉम्बने उडविण्याची धमकी

शाळेला बॉम्बने उडविण्याची धमकी

Published on

शाळेला बॉम्बने उडविण्याची धमकी
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : काशी मिरा येथील एका नामांकित शाळेला सोमवारी (ता. १) सकाळी सहा वाजता एका अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला. शाळा प्रशासनाकडून त्याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने शाळेच्या संपूर्ण परिसरात बंदोबस्त ठेवला आणि बॉम्बशोध पथक व श्वानपथकासह शाळेची कसून तपासणी सुरू करण्यात आली. परिसरात यामुळे तणाव निर्माण झाला होता. दुपारी शोध घेतल्यानंतरही पोलिसांना काहीही सापडले नाही. धमकीचा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com