महापरिनिर्वाण दिनानिमित्त “युगंधराला स्वरांजली” या कार्यक्रमाचे आयोजन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त “युगंधराला स्वरांजली” या कार्यक्रमाचे आयोजन

Published on

मुरबाड नगरपंचायत येथे डॉ. आंबेडकरांना ‘युगंधराला स्वरांजली’
सरळगांव ता. २ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुरबाड नगरपंचायत येथे शोकाकुल वातावरणात ‘युगंधराला स्वरांजली’ या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ५) सकाळी ९ वाजता शांत व भक्तिभावाने पार पडेल. अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अण्णा साळवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनजी कथोरे उपस्थित राहतील. यावेळी जिल्ह्यातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने महामानवाला आदरांजली अर्पण करतील. या संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमात संवेदनशील आवाज असलेल्या शाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी यांच्या शब्दांतून बाबासाहेबांचा त्याग, संघर्ष आणि मानवमुक्तीचा विचार व्यक्त करत स्वरांजली वाहिली जाईल. आयोजक अण्णा साळवे यांनी मुरबाडकरांना मौन, श्रद्धा आणि शिस्तीच्या वातावरणात उपस्थित राहून महामानवाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com