एचआयव्हीविषयी नागरिकांमध्‍ये जनजागृती

एचआयव्हीविषयी नागरिकांमध्‍ये जनजागृती

Published on

एचआयव्हीविषयी नागरिकांमध्‍ये जनजागृती
सीसीडीटी, मुंबई रेल्वे पोलिसांचे स्वाक्षरी अभियान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : जागतिक एड्स दिनानिमित्त सीसीडीटी संस्थेने मुंबई रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करून एचआयव्हीविषयी जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला. सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राइट्स (एसआरएचआर) या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या कार्यक्रमात किशोरवयीन मुलांच्या समाजजागृतीतील भूमिकेवर विशेष भर देण्यात आला.
एचआयव्हीग्रस्त बालकांना भेडसावणारा भेदभाव, तथ्याधारित माहितीचा अभाव आणि समाजातील गल्लत दूर करण्याची सामूहिक जबाबदारी यावर या मोहिमेतून ठोस भूमिका मांडण्यात आली. भेदभावमुक्त, माहितीसमृद्ध आणि सर्वसमावेशक वातावरण निर्मितीची गरजही या वेळी अधोरेखित झाली.
अभियानाला वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी अकरम निकम, सीसीडीटी संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सुकन्या पोद्दार, एम·ए·सी कॉस्मेटिक्स इंडिया यांच्या ब्रॅण्ड डायरेक्टर कॅरन थॉम्पसन आणि सीसीडीटीचे चाइल्ड प्रोटेक्शन व एचआयव्ही कार्यक्रम प्रमुख दीपक त्रिपाठी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com