राज्यात ५१ लाख लोक हायपर टेन्शनने ग्रस्त, वर्षभरात १० लाख रुग्णांची वाढ
राज्यातील ५१ लाख नागरिक तणावाखाली
वर्षभरात उच्च रक्तदाबाच्या १० लाख रुग्णांची भर
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून, त्यामुळे त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातही उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यंदा वर्षभरात राज्यातील दीड कोटी नागरिकांच्या तपासणीत तब्बल ५१ लाख नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. विशेष म्हणजे वर्षभरात या रुग्णांची संख्या १०.२८ लाखांनी वाढली आहे.
अलीकडच्या काही वर्षांत लोकांच्या राहणीमानात बदल होत आहे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही वेळ मिळत नाही. आर्थिक जबाबदारी, कामाचा ताण, वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळे लोकांमध्ये तणाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तणावमुक्तीसाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मानसिक ताणाचा त्रास हृदयावरही होतो. त्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचेही प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे कोरोनानंतर कोणत्याही वयात हा त्रास जाणवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
---
दोन वर्षांतील आकडेवारी
रुग्णसंख्या २०२५-२६ २०२४-२५
तपासणी १,४८,४४,४९१ १,४३,३९,६६५
निदान ५१,५७,४२९ ४१,२८,९५२
उपचार ८,२१,१४८ ७,२९,३२७
आजारावर मात ६,२५,७१० ५,४९,२८७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

