बदलापुरात दोन लाखांची रोकड जप्त
बदलापुरात दोन लाखांची रोकड जप्त
बदलापूर, ता. २ (बातमीदार) ः शहराच्या पूर्वेतील हॉली क्रॉस शाळेसमोर एक व्यक्ती पिशवीत रोकड घऊन फिरत असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी त्याला थांबवले. त्या वेळी संबंधित व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत होता. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत पिशवीतील रोकड ताब्यात घेतली. मंगळवारी (ता. २) मतदानाच्या दिवशी हा प्रकार घडला.
ही रोकड मतदारांना प्रलोभन म्हणून वाटण्यासाठी आणली होती का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर रोकड सापडण्याच्या घटनेमुळे निवडणूक आचारसंहितेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

