पनवेल शहरातील उद्यानाचे नुतनीकरण
पनवेल शहरातील उद्यानाचे नुतनीकरण
पनवेल (बातमीदार)ः पनवेल महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उद्याने अधिक सुंदर, सुरक्षित, नागरिकांसाठी उपयुक्त करण्याच्या उद्देशाने ठाणेनाका रोडवरील लायन्स उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या उद्यानातील लॉन, सुरक्षा भिंत, ॲम्फी थिएटरची दुरुस्ती तसेच उद्यानात आकर्षक विद्युत खांब बसवून प्रकाशयोजना सुधारणा उद्यानाच्या नुतीनकरणामध्ये करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेने पुढील काळात शहरातील इतर उद्यानांचेही सुधारणा व सौंदर्यीकरण करण्याची योजना हाती घेतली आहे. त्यानुसार नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित, आधुनिक, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा संकल्प असल्याचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

