पीडित महिलांची जुहूगावातून सुटका
पीडित महिलांची जुहूगावातून सुटका
नवी मुंबई(वार्ताहर): जुहूगाव येथे मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात सहा पीडित महिलांची नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सुटका केली. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तर तिचा सहकारी फरार आहे.
वाशी सेक्टर-११, जुहूगाव येथील आरपणाच सलून अॅण्ड स्पामध्ये मसाजच्या नावाखाली जबरदस्तीने देहव्यापार सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी (ता.३०) दुपारी बनावट ग्राहकाला पाठवण्यात आले होते. यावेळी स्पामध्ये सहा महिलांना जबरदस्तीने देहव्यापार करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानुसार पथकाने स्पाची मॅनेजर आसिमा घोष (३४), तिचा साथीदार नूर शेख विरोधाक वाशी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १४३(३), ३(७) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९७६ कलम ३, ४, ७ व ७(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत तिला पोलिस कस्टडी मंजूर केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

