धकाधकीच्या जीवनात संगीतमय हास्य योगा हा सर्वात महत्त्वाचा उपाय – माजी आमदार नरेंद्र पवार

धकाधकीच्या जीवनात संगीतमय हास्य योगा हा सर्वात महत्त्वाचा उपाय – माजी आमदार नरेंद्र पवार

Published on

संगीतमय हास्य योगा हा महत्त्वाचा उपाय ः नरेंद्र पवार
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : आजच्या ताणतणावपूर्ण आणि गतिमान जीवनशैलीत हास्य योगा हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी उपाय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. कल्याणातील ‘लय भारी हास्य ग्रुप’च्या दुसऱ्या शाखेचे उद्‍घाटन त्यांच्या उपस्थितीत नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात झाले. दिलीप सूचक आणि दक्षा सूचक या दाम्पत्याने या हास्य ग्रुपची सुरुवात केली आहे.
नरेंद्र पवार यांनी सूचक दाम्पत्याला नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात हास्य ग्रुपची दुसरी शाखा सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ही दुसरी शाखा सुरू केली आहे. पहिली शाखा क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके मैदानात गेल्या वर्षी सुरू झाली असून सध्या त्यामध्ये १०० पेक्षा अधिक सदस्य सक्रिय आहेत. या शाखेच्या पहिल्याच दिवशी ३५ हून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून पुढील महिन्यात सदस्यसंख्या अडीचशेपर्यंत वाढेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com