रस्ता सुरक्षा अभियानासाठी वाहतुक विभागाकडून विविध स्पर्धांचे आयोजन
रस्ता सुरक्षा अभियानात शाळांचा सहभाग
ठाणे वाहतूक विभागाकडून विविध स्पर्धांचे आयोजन
ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) ः वाढत्या अपघातांना आळा बसावा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने यंदा ठाण्यातील शाळांना सहभागी करून घेतले आहे. विद्यार्थ्यांसाठी विभागवार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धकांमधील पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार, सहपोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी रस्ता सुरक्षा अभियानच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयातील वाहतूक विभाग व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक उपायुक्त कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या वेळी रस्ता सुरक्षा अभियान आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्व शाळांमध्ये वाहतूकविषयक जनजागृती करणे व वाहतूक विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विभागवार स्पर्धा आयोजित करण्यात आला आहेत.
विविध स्पर्धा
- भविष्यातील वाहतुकीचे नियोजन या विषयावर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहनपर कल्पक प्रकल्प स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रत्येक शाळेतून दोन उत्कृष्ट प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. या कल्पकता स्पर्धेसह अन्य विविध स्पर्धांमध्ये आणि परेड संचलनात पहिले तीन (प्रथम, द्वितीय, तृतिय) क्रमांक मिळविणाऱ्या संघांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
- पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रंक अँड ड्राइव्ह, सिग्नल जंपिंग, विदाऊट हेल्मेट, ब्लाइंड स्पॉट, मोबाईल टॉकींग असे चित्रकला विषय आहेत, तर चित्रांचे प्रदर्शन २६ जानेवारी ते ३१ जानेवारीमध्ये होणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये साकेत मैदान येथे भरवण्यात येणार आहे. निवडक चित्रे वाहतूक पोलिसच्या दिनदर्शिकेमध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत.
परेड संचलन
प्रत्येक विभागातून दोन मुले, दोन मुली व एक बँड पथक अशी २५ पथके परेड संचलन करणार आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी साकेत मैदानात होणाऱ्या संचलनात आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोहामध्ये शाळांचे हे परेड संघ बॅण्ड पथकासह सहभागी होणार आहेत. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी नाव नोंदणीसाठी शिक्षकांची माहिती https://forms.gle/CgkcKU३Cqnx६fhLEA या गुगल लिंकमध्ये भरून पाठवावी, अथवा ८०९७२१२६०६, ७९७७२५३३०५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

