‘समृद्धी’वर आणखी 
नऊ ठिकाणी सुविधा केंद्र

‘समृद्धी’वर आणखी नऊ ठिकाणी सुविधा केंद्र

Published on

‘समृद्धी’वर आणखी
नऊ ठिकाणी सुविधा केंद्र
रेस्टाॅरंट, पेट्रोलपंप, स्वच्छतागृहाची व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ठिकठिकाणी सुविधा केंद्र उभारले जात आहेत. आतापर्यंत २९ ठिकाणी पेट्रोलपंप, रेस्टाॅरंट, फूड माॅल, स्वच्छतागृह, गॅरेजची सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याच महामार्गावर आणखी नऊ ठिकाणी या सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
एमएसआरडीसीने तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्चून मुंबई ते नागपूरदरम्यान ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग उभारला. जूनमध्ये या महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे हा अखेरचा टप्पा सुरू झाल्यानंतर हा संपूर्ण मार्ग सुरू झाला. दरम्यान, या मार्गावर वाहनांची संख्या मोठी असली, तरी सुविधांची वाणवा असल्याने सुरुवातीला प्रवाशांची गैरसोय होत होती. त्याची दखल घेत एमएसआरडीसीने सुरुवातीला २२ ठिकाणी प्रवाशांना जेवण, चहा, नाश्ता, विश्रांती घेता यावी, म्हणून ठिकठिकाणी रेस्टाॅरंट, पेट्रोलपंप, गॅरेज सुरू केले होते. त्यानंतर सात आणि आता आणखी नऊ ठिकाणी सुविधा केंद्र उभारले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार असल्याचे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, समृद्धी मार्गावर कोणतेही अडथळे नसल्याने वाहनचालक बेफाम गाड्या चावलत आहे; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वाहनचालकांनी वेग मर्यादेतच वाहने चालवावीत, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com