महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोलीत भव्य ‘भिमज्योत रॅली’

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोलीत भव्य ‘भिमज्योत रॅली’

Published on

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोलीत भव्य ‘भिमज्योत रॅली’
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोली परिसरात यंदाही भव्य आणि अनुशासित ‘भिमज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १२ या वेळेत दोन प्रमुख मार्गावरून ही रॅली निघणार असून ऐरोली, दिवा व परिसरातील हजारो बुद्ध उपासक शुभ्रवस्त्र परिधान करून रॅलीत सहभागी होणार आहेत. जेतवन सामाजिक संस्था तसेच विविध बौद्ध विहारांच्या पुढाकारातून ही भिमज्योत रॅली पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पहिली रॅली ऐरोली सेक्टर-२ मधील तक्षशिला बुद्ध विहार येथून रात्री ८ वाजता त्रिसरण व पंचशील ग्रहण करून, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून सुरू होईल. त्यानंतर संविधान चौक, ज्ञानदीप शाळा, ऐरोली नाका येथील महाबोधी बुद्धविहार, समता नगरातील जय भिम स्तंभ, तसेच साईनाथ वाडीतील शांतीदूत बुद्धविहार, पंचशील बुद्ध विहार, से.२० विश्वशांती बुद्ध विहार, से.१९ आनंदवन बुद्धविहार या मार्गाने रॅली पुढे सरकेल. यानंतर रॅली सेक्‍टर ३ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, सुपर मार्केट, जेतवन बुद्धविहार, से.४ मधील जय भिम स्तंभ, से.१ अशोकवन बुद्धविहार, से.५ सिडको कार्यालय, से.१६ आंबेडकर चौक, तसेच से.१०-११ मधील जयभिम स्तंभ अशा महत्त्वाच्या स्थळांना अभिवादन करीत ऐरोली सेक्टर-११ येथील नवी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ध्वजवंदनासह सांगता होईल.
.............
चौकट
दुसरी रॅली ऐरोली सेक्टर-६ मधील नालंदा विपश्यना केंद्र येथून रात्री ८ वाजता सुरू होईल. ही रॅली सेक्टर-६, ७, ८, यश पॅराडाईज, डिमार्ट, सेक्टर-१०, गरम मसाला हॉटेल, दिवा गाव चौक मार्गे पुढे जाईल. सेक्टर-११ मधील जयभिम स्तंभास वंदन करेल आणि त्यानंतर आंबेडकर स्मारक येथे एकत्रितपणे सांगता करण्यात येईल. या संपूर्ण आयोजनाबाबत जेतवन सामाजिक संस्था व बौद्ध विहारांचे पदाधिकारी डॉ. पी. एस. गौतम, आप्पासाहेब शिवशरण, प्रा. व्यंकट माने, बाळासाहेब डोळस यांनी सर्व उपासक-उपासिकांना शुभ्रवस्त्र परिधान करून शांततापूर्ण व अनुशासित पद्धतीने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com