

पूर्ववैमनस्यातून महिलेचा तरुणीच्या बोटाला चावा
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : पूर्ववैमनस्यातून शेजारी राहणाऱ्या अनिता ऊर्फ विजू संजय मेस्त्री (वय ५३) या महिलेने प्रियांका शंकर सागर (वय २७) या तरुणीला शिवीगाळ करीत तिच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना कामतघर परिसरातील भाग्यनगर येथे घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघीही एकमेकींच्या शेजारी राहत असून, त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादाच्या रागातून सोमवारी (ता. १) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अनिताने प्रियांकाला शिवीगाळ करून धक्का दिला. याचा जाब विचारताच अनिताने प्रियांकाचा उजवा हात पकडून तिच्या तर्जनीला चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी अनिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला भादंवि कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस बजावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.