दिघा परिसरात पदपथ अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल
दिघा परिसरात पदपथ अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल
वाशी, ता. २ (बातमीदार) : ठाणे–बेलापूर मार्गावरील दिघा परिसरातील दिघा बाबा मंदिर ते संजय गांधी नगर या मुख्य मार्गावरील पदपथ भंगार माफिया आणि काही दुकानधारकांच्या अतिक्रमणामुळे अक्षरशः गिळंकृत झाला आहे. परिणामी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे कठीण झाले असून वाहतूक कोंडीही तीव्र झाली आहे. राजकीय पाठबळामुळे हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
संजय गांधी नगर परिसरातील रस्त्यालगत भंगारमाफियाने अनधिकृतरीत्या हॉटेल आणि राजकीय जनसंपर्क कार्यालय उभारले असून, यामुळे रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांनी लाकडी वखार, मटण विक्री, तसेच इतर व्यवसाय खुलेपणाने पदपथावर थाटले आहेत. पादचाऱ्यांसाठी राखीव असलेला संपूर्ण पदपथ जागोजागी व्यापाऱ्यांच्या साहित्याने, खुर्च्यांनी आणि ठेल्यांनी अडवला जातो. विशेषतः सायंकाळच्या वेळी दुकानदार रस्त्यावरच खुर्च्या टाकून बसतात, ज्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याशिवाय, संध्याकाळच्या सुमारास राजकीय कार्यकर्त्यांच्या गाड्या या अनधिकृत कार्यालयाबाहेरच बेशिस्तपणे उभ्या राहतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रारी करूनही या ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. या संबंधात ऐरोली विभाग अधिकारी नैनेश बदले यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित परिसराची पाहणी करून अतिक्रमणावर निश्चित कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

