नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे मतदान

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे मतदान

Published on

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे मतदान
बदलापूर, ता. २ (बातमीदार) : नगर परिषदेच्या निवडणुकीला सर्वच उमेदवारांनी मतदान करून उत्साहात सुरुवात करून दिली. नगराध्यक्षपदाच्या सर्व प्रमुख उमेदवारांनी आपापल्या मतदान केंद्रांवर हजर राहून मतदानाचा हक्क बजावला. या वेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. या निवडणुकीत पहिल्यांदाच पॅनेल पद्धती लागू करण्यात आली असून, ४९ पैकी सहा जागांची निवडणूक स्थगित झाल्याने मतदारांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला होता. मंगळवारी ४९ पैकी ४३ जागांवर मतदान झाले तरीही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळावा, मतदारांनी निर्भयपणे आणि उत्साहाने मतदान करावे, यासाठी उमेदवारांनी स्वतः पुढाकार घेतला.

महाविकास आघाडीच्या प्रिया गवळी, शिवसेना शिंदे गटाच्या वीणा म्हात्रे, भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या रुचिता घोरपडे, आम आदमी पार्टीच्या आस्था मांजरेकर तसेच अपक्ष संगीता चेंदवणकर यांनी सकाळपासून मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना सर्वांनी यंदाच्या निवडणुकीत आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शहरातील महत्त्वाच्या घडामोडी, पॅनेल पद्धतीची नवी व्यवस्था आणि काही जागांवरील स्थगिती या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे मतदान विशेष लक्षवेधी ठरले असून, दिवसाचा मतदानाचा वेग वाढवण्यात त्यांच्या उपस्थितीने सकारात्मक वातावरण तयार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com