शिवशाहीची ३३४ घरे ‘डीआरपी’कडे!
धारावीतील शिवशाहीची
३३४ घरे ‘डीआरपी’कडे!
दुरुस्तीचा साडेबारा कोटींचा खर्च करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची धारावीतील ३३४ घरे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी (डीआरपी) सुपूर्द करण्यात आली आहेत. ही घरे भाडेतत्त्वावर दिली असली, तरी ती वर्षानुवर्षे बंद असल्याने त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याचा सुमारे साडेबारा कोटींचा खर्च असून, शिवशाहीला देय असलेल्या भाड्यातून तो भागवला जाणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवत असताना रहिवाशांची गैरसोय होऊ नये, विकसकाला संक्रमण शिबिरे उपलब्ध व्हावीत, म्हणून मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या वतीने अनेक संक्रमण सदनिका उभारण्यात आल्या. धारावी शेड काॅम्प्लेक्स येथे शिवशाहीच्या सातमजली सहा इमारती असून, त्यापैकी चार इमारती अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. येथील ४२२ पैकी ३३४ सदनिका ‘डीआरपी’ला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय शिवशाहीने घेतला होता. त्यानुसार शिवशाहीने नुकतीच ही घरे ‘डीआरपी’ला सुपूर्द केली आहेत. दरम्यान, ही घरे दुरुस्ती करावी लागणार असल्याने पुढील पाच वर्षांच्या भाड्यातून त्याचा खर्च केला जाणार आहे. त्यानंतर शिवशाहीला प्रत्यक्ष भाडे मिळण्यास सुरुवात होणार आहे.
---
वार्षिक अडीच कोटी मिळणार
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी शिवशाहीकडून देण्यात आलेल्या प्रति सदनिकेसाठी मासिक आठ हजार रुपये भाडे आणि ४० हजार रुपये डिपाॅझिट मिळणार आहे. त्यामुळे वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये शिवशाहीच्या पदरी पडणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

