विरार–नालासोपारा मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

विरार–नालासोपारा मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी

Published on

विरार-नालासोपारा मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी
शिवसेना स्‍थानिक महिला संघटनेकडून पालिकेला निवेदन
वसई, ता. २ (बातमीदार) ः विरार-नालासोपारा लिंक रोडवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या मार्गावरील तुटलेल्या प्लॅस्टिक हॅम्प प्रकारातील गतिरोधकांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आणि वाहनचालकांच्या वाढत्या तक्रारींमुळे या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरी गतिरोधक बसवण्याची मागणी शिवसेना महिला तालुका संघटक अश्विनी रोहन चव्हाण यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना विरार पश्चिम प्रभाग क्रमांक ११ तर्फे शिष्टमंडळाने महापालिका शहर अभियंता प्रदीप पाचंगे तसेच कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी सांगितले, की सध्याचे प्लॅस्टिक गतिरोधक तुटलेल्या अवस्थेत असून त्यांचा कोणताही उपयोग नाही. त्यामुळे वाहनांची गती नियंत्रणात राहत नसून, रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येत आहेत. अश्विनी चव्हाण यांनी पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देताना सांगितले, की विरार पश्चिमेकडील या प्रमुख मार्गांवरून रोज हजारो नागरिक प्रवास करतात. हा मार्ग ज्या प्रमाणात गजबजलेला आहे, त्यानुसार मजबूत आणि टिकाऊ गतिरोधकांची आवश्यकता आहे. तुटके गतिरोधक केवळ दिखावा ठरत असून, ते कोणत्याही क्षणी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी डांबरी स्पीड ब्रेकर बसवून वाहतूक व्यवस्था सुकर करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत शहर अभियंता कार्यालयाकडून प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच नवीन डांबरी गतिरोधक बसवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले. या वेळी शिवसेना शहरप्रमुख रोहन चव्हाण, शहर संघटक आशा शिरसाट, उपशहरप्रमुख नरेंद्र आचरेकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com