उल्हासनगरात महिला पोलिसांच्या समुपदेशाने ६० जोडप्यांचा संसार पुन्हा रुळावर

उल्हासनगरात महिला पोलिसांच्या समुपदेशाने ६० जोडप्यांचा संसार पुन्हा रुळावर

Published on

महिला पोलिसांच्या समुपदेशनाने ६० जोडप्यांचा संसार पुन्हा रुळावर
सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २ : किरकोळ वाद आणि गैरसमजांमुळे तुटण्याच्या मार्गावर असलेल्या ६० जोडप्यांचे संसार उल्हासनगरमधील पोलिस परिमंडळ ४ अंतर्गत महिला तक्रार निवारण केंद्रातील महिला पोलिसांनी यशस्वी समुपदेशन करून पुन्हा जुळवले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी महिला पोलिसांच्या चमूला शाबासकी दिली.
परिमंडळ ४ मधील आठ पोलिस ठाण्यांमध्ये कौटुंबिक वाद आणि छळाची एकूण १७० प्रकरणे महिला तक्रार निवारण केंद्रात आली होती. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा माळी यांनी महिला पोलिस हवालदार सुलक्षणा चंदनशिवे, सुशीला जोशी, पोलिस नाईक सविता काकड, मनीषा रहाणे, पोलिस शिपाई प्रियाका जगताप यांच्या चमूने या जोडप्यांचे सातत्याने समुपदेशन केले. सततच्या प्रयत्नानंतर १७० पैकी ६० जोडप्यांनी त्यांचे मतभेद, गैरसमज दूर करून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या केंद्राने कायदेशीर कारवाईपेक्षा सामंजस्य आणि सलोख्याला प्राधान्य देत हे यश मिळवले.
एका प्रकरणात दारू आणि जुगाराच्या व्यसनात अडकलेल्या पतीने एकत्रित कुटुंबासाठी व्यसनाला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांचे तुटलेले कुटुंब पुन्हा आनंदाने एकत्र आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com