माजी नगरसेविकेच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार
माजी नगरसेविकेच्या घरासमोर उतारा
मोहने येथील फुले नगर परिसरातील घटना
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविकेच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीने नागवेली, विविध जिन्नस आणि काळी बाहुली असलेला उतारा ठेवल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मोहने येथील फुले नगर परिसराच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचे पती सिद्धार्थ गायकवाड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
गायकवाड यांनी म्हटले आहे की, निवडणुकीत निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे काही जणांची पातळी खालावत चालली आहे. ते अंधश्रद्धेवर आधारित अशा प्रकारांचा अवलंब करत आहेत. अशा कृत्यांनी आम्ही घाबरणार नाही. उलट हा उतारा आमची भीती नाही, तर विरोधकांची असुरक्षितता दाखवतो,” असे ते म्हणाले. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, परंतु सरळ पद्धतीने सामना करण्याची हिंमत नसल्यामुळे काही जण अंधश्रद्धेचा आधार घेतात, असा आरोप गायकवाड यांनी केला. अंधश्रद्धाबाबत माझ्या प्रभागात अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविले आहेत. त्यामुळे या गोष्टीबाबत मला भीती नाही. या घटनेनंतर आपला निर्धार अधिक मजबूत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

