ठाण्यात १० हजार दुबार मतदार

ठाण्यात १० हजार दुबार मतदार

Published on

ठाण्यात १० हजार दुबार मतदार
प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ; शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ठाणे पालिका हद्दीत १० हजार ६५३ दुबार मतदार आढळले आहेत. वेगवेगळ्या प्रभागांत सहा हजार ६४९ एकच नावे असून, फक्त नाव आणि आडनाव असलेले तीन हजार ४८५ मतदार याद्यांमध्ये आहेत. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेत मतदार यादीतील घोळ असलेले पुरावे दिले.

प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी २७ नोव्हेंबर ही शेवटची तारीख ठरवण्यात आली. परंतु ठाणे महापालिकेने मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने हरकती घेण्याची मुदत ३ डिसेंबर अशी करण्यात आली. या सर्व प्रभागांच्या याद्या घेण्याकरिता गेले असताना संपूर्ण याद्यांची एकत्रीकरण पुस्तके बनवून गठ्ठे देण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. हे गठ्ठे फोडून पुरवण्या जोडून याद्या तयार करायला दोन ते तीन दिवस लागले. त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्याचे या वेळी राजन विचारे यांनी सांगितले.

सात चुकांवर बोट

१- संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात मतदाराचे नाव किंवा आडनाव असलेले एकूण ३,४८५ अशी इपिक नंबरसहित यादी दाखवण्यात आली आहे.

२- मतदार यादीत नाव नसलेले परंतु मतदार ओळखपत्र असलेले एकूण १,५७५ दाखविण्यात आले आहेत.

३- ३३ प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात दुबार मतदार दाखवण्यात आले नसले, तरी १० हजार ६५३ अशाप्रकारचे मतदार असल्याचे सांगत ठाकरे गटाने उदाहरणासहित पर्दाफाश केला आहे.

४- एकच नाव असलेल्या व्यक्ती दोन-दोन प्रभागांमध्ये असलेले एकूण ६,६४९ मतदार आढळले आहेत.

५- एकच वोटर आयडी दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये व भिन्न विधानसभेत आढळले आहेत. मागील विधानसभेला ही नावे एकूण ८,६०९ होती. तीच नावे अंतिम यादीतही टाकण्यात आल्याची शंका आहे.

६- एकूण मतदार १,०८१ असणाऱ्या यादीत ओळख पटणारे ६७६, मृत २१; तर ओळख पटतच नाही परंतु इतर प्रभागातून टाकण्यात आलेली एकूण ३८४ नावे निदर्शनास आली आहेत.
.
७- शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ५६२ मतदार आढळले आहेत. त्यामध्ये काहींचे वय कमी आहे, परंतु १०४ वय दाखवलेले आहे. अनेक ठिकाणी लिंगही बदलण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com