कोपरीतील शिंदेसेनेचे उपविभाग उबाठात
शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख ठाकरे गटात
स्थानिक नगरसेवक पदाधिकारी विचारात घेत नसल्याने निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे पूर्व कोपरी हा शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्याला शिवसेना ठाकरे गटाने खिंडार पाडले आहे. मागील २० ते २२ वर्षांपासून उपशाखाप्रमुख असलेले व विद्यमान उपविभागप्रमुख आबा मोरे यांच्यासह २०० ते ३०० शिवसैनिकांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला. माजी सभागृहनेते पांडुरंग पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. त्यांच्या पक्ष प्रावेशामुळे कोपरीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपने शिवसेनेतील पदाधिकारी व माजी नगरसेवकांना भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने दोन्ही पक्षात तणावाचे वातवरण आहे. असे असताना मंगळवारी कोपरीतील जुने शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक माजी नगरसेवकांकडून मिळत असलेले दुय्यम स्थान, मागील नऊ वर्षांत विविध स्थानिकांची कामे घेऊन गेले असता, एकही काम केले नसल्याचा आरोप करीत, आम्हाला कोपरीत आमच्याच पक्षात कोणीच वाली नसल्याची भावना उपविभागप्रमुख आबा मोरे यांनी व्यक्त केली. तसेच यासंदर्भात अनेकदा पक्षातील वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनदेखील कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने अखेर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याचे मोरे यांनी सांगितले. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार राजन विचारे, युवासेना कोपरी पाचपाखाडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

