चार नगराध्यक्ष आणि ३१९ उमेदवारांसाठी मतदान

चार नगराध्यक्ष आणि ३१९ उमेदवारांसाठी मतदान

Published on

पालघरमध्ये सरासरी ७८ टक्के मतदान
जिल्ह्यात चार नगराध्यक्ष आणि ३१९ उमेदवारांसाठी निवडणूक
पालघर, ता. २ ः पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार आणि वाडा नगर परिषदांच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या चार नगराध्यक्षपदांसह ३१९ उमेदवारांसाठी मंगळवारी मतदान झाले. ९४ नगरसेवकपदाच्या जागांसाठी एकूण ३२६ उमेदवार रिंगणात होते. पालघर हद्दीतील प्रभाग क्रमांक एक आणि वाडा येथील प्रभाग क्रमांक बारा या दोन प्रभागांची निवडणूक पुढे ढकलल्याने या प्रभागात सात नगरसेवकपदांसाठी मतदान झाले नाही, मात्र येथे नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले. चारही शहरात सरासरी ७८ टक्के मतदान झाले.

पालघर नगर परिषदेसाठी नगरसेवकपदाच्या ३० जागा, डहाणू नगर परिषदेसाठी २७, जव्हार नगर परिषदेसाठी २०, तर वाडा नगर पंचायतीसाठी १७ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. सर्व ठिकाणी दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढत गेला. पालघर शहरात दुपारच्या ३.३० वाजेच्या सत्रात एकूण ५५७२७ मतदारांपैकी २४६४१ मतदारांनी म्हणजे ४४.२२ टक्के मतदान केले. डहाणूत दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३८६९३ मतदारांपैकी १९१८० मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ४९.५७ टक्के होती. जव्हारमध्ये ३.३० वाजेपर्यंत ९३३८ मतदारांपैकी ४७९० मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५१.३० टक्के इतकी होती. वाड्यात दुपारच्या सत्रात एकूण १२८९३ मतदारांपैकी ६७१९ मतदारांनी म्हणजे ५२.११ टक्के मतदान केले. या वेळेदरम्यान जिल्ह्यात साधारण ३५ ते ४५ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी ४ वाजताच्या नंतर मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लगायला सुरुवात झाली. शेवटच्या सत्रात जिल्ह्यात पालघर नगर परिषदेत ७० टक्के, डहाणू नगर परिषदेत ६७.२३ टक्के, जव्हार नगर परिषदेत ८२.९४ टक्के, तर वाडा नगर परिषदेत ७४.७८ टक्के मतदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com