रायगडमध्ये सरासरी ६९.८१ टक्के मतदान
रायगडमध्ये सरासरी ६९.८१ टक्के मतदान
अलिबाग, ता. २ : रायगड जिल्ह्यातील १० नगर परिषदांसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी ६९.८१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान आकाराने लहान असलेल्या माथेरान गिरीस्थानक नगर परिषदेमध्ये ८३.३५ टक्के झाले, तर खोपोली, अलिबाग, कर्जत, रोहा येथे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
३०८ मतदान केंद्रावर झालेल्या या मतदानादरम्यान महाड, रोहा येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. याचे पडसाद जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांमध्ये उमटल्याचे दिसून आले. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मतदान यंत्र बंद पडणे या सारख्या घटना घडल्याने कर्जत, अलिबाग, खोपोली येथे शेवटचे मतदान बंद होण्यास उशीर झाला. त्यामुळे मतदानाची शेवटची आकडेवारी येण्यास विलंब होत असल्याचे नगर परिषद प्रशासन शाखेचे प्रशासन अधिकारी विराज लबडे यांनी सांगितले. मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्र सील करून ते स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत निवडणूक कर्मचारी करीत होते.
---
नगर परिषद/ मतदार/ टक्केवारी
माथेरान/ ४,०५५/ ८५.३५
मुरूड-जंजिरा/ ११,५४४/ ७३.८९
श्रीवर्धन/ १२,६३७/ ६६.२३
उरण/ २६,०७४/ ६५.७०
पेण/ ३३,८७५/ ७०.३०
महाड/ २३,१२४/७१.०३
रोहा/ १७,६६९/ ६५.०५
कर्जत/ २९,९५७/ ६६.६०
अलिबाग/ १६,३५४/ ७०.८०
खोपोली/ ६२,०७४/ ६३.२०
एकूण/ २,३७,५०३/ ६९.८१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

