चालू विद्यूत पुरवठ्यात विद्यूत रोहीत्र चोरीला,

चालू विद्यूत पुरवठ्यात विद्यूत रोहीत्र चोरीला,

Published on

खोडाळ्याात विद्युत रोहित्र चोरीला
दोन वर्षांतील दुसरी घटना; भंगार चोर मोकाट
मोखाडा, ता. ५ (बातमीदार) ः तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील ३ नंबर लाइनच्या विद्युतपुरवठ्यासाठी बसवलेले विद्युत रोहित्र चालू वीजपुरवठ्यात उघडले. तसेच यातील तांब्याची वायंडिंग चोरून, भंगारमाफियांनी रात्री पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता. ३) घडली आहे. मागील दोन वर्षांतील याच ठिकाणाहून विद्युत रोहित्र चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेची फिर्याद मोखाडा पोलिस ठाण्यात दाखल केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

मोखाडा तालुका भंगारमाफियांसाठी आंदन ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले अपघात अडथळे (क्रॅश बॅरिअर्स), दिशा फलक इत्यादी लोखंडी ऐवज चोरी पाठोपाठ, आता भंगार चोरांनी नळ पाणीपुरवठा योजनांकडे मोर्चा वळवला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सोलर पॅनेल, उपसा पंप आणि केबल चोरीला जात आहेत. त्यामुळे अशा नळयोजना बंद पडल्या असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
---
कृत्रिम पाणीटंचाई
तालुक्यातील चास, धामणशेत, कारेगाव, साखरी, डोल्हारा व दुधगाव या ग्रामपंचायत हद्दीतील नळयोजनांचे साहित्य चोरीला गेलेले आहे. चास व धामणशेत येथील केबलची दोन वेळेस चोरी झालेली आहे, तर साखरी, डोल्हारा, कारेगाव आणि दुधगाव येथील केबल आणि पंप चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यामुळे येथील सौरऊर्जेवर चालणारी नळ पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. खोडाळा येथील विद्युत रोहित्र चोरीमुळे येथील पाणीपुरवठा योजना बंद पडणार आहे. पर्यायाने ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.
--
उत्पन्नाचे साधन
भंगारमाफियांसाठी मोखाडा तालुका हा उत्पन्नाचे साधन ठरला आहे. यापूर्वी लाखो रुपयांचे अपघात अडथळे, दिशादर्शक फलक, विद्युत रोहित्र आदी किमती साहित्याची चोरी झाली आहे. यात क्रॅश बॅरिअर्स अर्थात अपघात अडथळ्यांची सातत्याने चोरी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नटबोल्टऐवजी वेल्डिंग करून क्रॅश बॅरिअर्स बसवले होते. त्यावरही कडी करून चोरट्यांनी तेही कापून नेले आहेत. दरवर्षी सातत्य ठेवून क्रॅश बॅरिअर्सची चोरी होऊन लाखो रुपयांचा माल हडप केला आहे, मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी क्रॅश बॅरिअर्स बसवले जात आहेत. त्यामूळे भंगारमाफियांसाठी मोखाडा तालुका हा आयतेच आंदन ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com